Marathi Biodata Maker

दहावी गणिताचा पेपर फुटला

Webdunia
गुरूवार, 16 मार्च 2023 (15:01 IST)
बारावीचा पेपर फुटल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यात दहावीच्या गणित भाग एकचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये पेपर आढळल्याचे सांगितले जात आहे. आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिला सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे.
 
परवानगी नसतानाही दहावीच्या परीक्षा केंद्रावर हॉलमधील फोटो काढल्यामुळे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात घडला आहे.
 
13 मार्च रोजी गणित भाग एकचा पेपर होता. यावेळी विद्यालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. 15 मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले असता आरोपी महिलेवर संशय आल्यामुळे तिच्या मोबाईलची झडती घेतली गेली. तेव्हा गणित भाग एक प्रश्न पत्रिकेचे फोटो काढल्याचे समोर आले. 
 
पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

अंजनगावात तणाव: शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; शहरात कडेकोट बंदोबस्त।

Maharashtra Political Crisis : संजय राऊतांचे भाकीत, शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे ५० आमदार भाजपशी हातमिळवणी करणार का?

नांदेडमधील 'तलवार बाबा'चे पितळ उघडे; भोंदूगिरीचा अड्डा उद्ध्वस्त, पोलीस कारवाईची मोठी बातमी

LIVE: महाराष्ट्रात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी अडचणीत आले

IPL 2026 : एलएसजी आणि डीसी खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक! वादाचा व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments