Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर संचारबंदी

camp tea fall
Webdunia
गुरूवार, 14 जुलै 2022 (11:56 IST)
पुणे- संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे पुढील 48 तास धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मसळधार पाऊस पडत आहे. तर हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
 
अतिवृष्टीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करु नये या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने अनेक पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू केले आहे. 
 
मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित होत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने पुण्यात 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी दिली आहे. तर पुणे महापालिकेने खासगी कंपन्या आणि आयटी कंपन्यांना घरून काम करण्याचे आवाहन केले आहे.
 
पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

भारताने दहशतवादी हल्ल्यांना अशा प्रकारे प्रत्युत्तर द्यावे, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस यांचे विधान

मुंबई: अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या वडिलांना २० वर्षांची शिक्षा

बीड : टायर फुटल्याने पिकअप उलटला, ३ जणांचा मृत्यू, १९ जखमी

LIVE: जातीय जनगणना हा राहुल गांधींचा राजकीय विजय- हर्षवर्धन सपकाळ

RR vs MI: सलग सहाव्या विजयासह मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली

पुढील लेख
Show comments