Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड

Webdunia
आता सरपंचाची निवड ही पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधूनच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील सरकारने आणलेल्या योजनांचा पुनर्विचार करुन ज्या योग्य असतील त्याच पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, जनतेतून थेट सरपंच निवडीच्या निर्णयामध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, सरपंच हा जनतेतूनच निवडला जावा अशी मागणी ‘महाराष्ट्र राज्य सरपंच संघटने’ने केली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला या संघटनेने विरोध दर्शवला आहे.
 
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्यणाबरोबरच इतरही काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये पुण्यात अध्यापकांसाठी कंपनी कायद्यानुसार प्रशिक्षण संस्था स्थापण करणे, पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांना १९९६पासून दोन वेतनवाढ देणे त्याचबरोबर रसायन तंत्रज्ञान संस्था, तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी देण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments