rashifal-2026

'राज ठाकरेंवर खटला दाखल करणार'

Webdunia
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (10:13 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यातून पकडून दिलेले ते तीनही नागरिक पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे नागरिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता या नागरिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पुणे पोलिसांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.
 
या सर्व प्रकाराने संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला असून याविरोधात आता कायदेशीर लढणार असल्याचा निश्चय या नागरिकांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी पुणे पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
 
सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे रोशन शेख, बाख्ती सरदार आणि दिलशाद हसन यांच्या घरी शनिवारी सकाळीच मनसेचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी तिघांना बांगलादेशी असल्याचे सांगून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर हे तिघेही पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे असल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान

रशियाने युक्रेनियन शहरावर क्षेपणास्त्रे डागली पुतिन सतत नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे झेलेन्स्की म्हणाले

भारतीय महिला हॉकी संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा

राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती विशेष

Savitribai Phule Quotes in Marathi: सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

पुढील लेख
Show comments