Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील तरुणीच्या मृत्यूतून पाच जणांना जीवनदान

Webdunia
शनिवार, 16 जुलै 2022 (15:03 IST)
ब्रेन डेड झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे की मृत्यूनंतरही माणूस अमर होऊ शकतो. ब्रेन डेड महिलेला पुण्यातील लष्कराच्या दक्षिण कमांड रुग्णालयात  (CHSC) आणण्यात आले. तिच्या  जगण्याची आशा संपल्यावर तिच्या  कुटुंबीयांनी तिचे अवयव किडनी, यकृत आणि डोळे दान केले. यामुळे पाच जणांच्या नवे जीवनदान मिळाले आहे. त्यापैकी दोन लष्करी जवान आहेत. 
 
दक्षिण  कमांडच्या संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, या मुलीला दुर्दैवी घटनेनंतर गंभीर अवस्थेत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. तिला रुग्णालयात आणले तेव्हा तिच्या   मेंदूने काम करणे बंद केले होते. यावर त्यांच्या कुटुंबीयांनी निर्णय घेतला की तिचे  अवयव अत्यंत गरज असलेल्या रुग्णांना दान केले जावे जेणे करून त्यांना जीवनदान मिळू शकेल.  
 
अवयवदान  प्रक्रियेसाठी आवश्यक परवानगी घेतल्यानंतर कमांड रुग्णालयातील प्रत्यारोपण पथक तातडीने कार्यरत झाले आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र आणि लष्कराच्या अवयव पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपण प्राधिकरण यांना सूचित करण्यात आले. या तरुणीचे अवयव 14 आणि 15 जुलै 2022 पहाटे ला भारतीय लष्करात सेवा बजावणाऱ्या दोन जवानांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले.  
 
आर्मी मेडिकल कॉलेजच्या आय बँक सीएच (एससी) मध्ये डोळे सुरक्षितपणे जतन करण्यात आले आणि पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. मरणोत्तर अवयवदानाच्या या चांगल्या आणि परोपकारी अशा कृतीमुळे मृत्यूनंतर देखील या तरुणीने 5  जणांना जीवनदान दिले आहेत. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

PKL 2024: गुजरात जायंट्स कडून बंगाल वॉरियर्सचा 2 गुणांनी पराभव केला

सीरियातील अलेप्पोमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू

पत्नी हुंड्यासाठी टोमणे मारते म्हणून पतीने सासरच्यांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंना लावली आग

LIVE: महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील का-संजय राऊत

संजय राऊत म्हणाले EVM च मंदिर बनवायला हवं, एका बाजूला PM ची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला शहांची प्रतिमा

पुढील लेख
Show comments