Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या,आम्ही त्याचा चौरंगा करु’, मनसेच्या रूपाली पाटील आक्रमक

Webdunia
सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (15:43 IST)
परिसरात घडलेल्या अत्यंत अमानुष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने 32 वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करुन तिची हत्या केली.तिच्या गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने 33 तासांच्या उपचारानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.पुणे मनसेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे  यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. मुंबईतील घडलेल्या घटनेनंतर पुण्यातील मनसे आक्रमक झाली आहे.
 
पुण्यातील मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबुकद्वारे राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. सरकारला बलात्कार करणाऱ्यावर कारवाई करता येत नसेल, तर त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु असे म्हणत इथं न्याय होणारच,असं रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.
 
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे.एका विकृत परप्रांतियाने महिलेवर पाशवी बलात्कार करुन तिची निर्दयपणे मारहाण करुन हत्या केली.
 
महिलेच्या गुप्तांगावर गंभीर जखमी झाल्याने महिलेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज सुमारे 33 तासानंतर अपयशी ठरली. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणातील नराधमाला पोलिसांनी अटक केली असून मोहन चौहान असे या क्रूरकर्म्याचे नाव आहे.तो मुळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्याला न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधली जातील, उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

LIVE: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा केली

बांगलादेशींच्या अवैध घुसखोरीवर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, चार जणांना अटक

पुढील लेख
Show comments