Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॉटेल मालकाने भिकाऱ्यांवर उकळतं पाणी टाकलं, तिघांचा मृत्यू

death
Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (17:52 IST)
आजच्या काळात भिकारींना तिरस्काराची वागणूक दिली जाते. कधीतरी कोणी त्यांच्यावर दया करून त्यांना खाण्यासाठी पैसे देतील किंवा अन्न देतील या आशेने ते भिक्षा मागत असतात. एखादा देवमाणूस त्यांना भेटतो आणि आपुलकीने त्यांना पोटभर जेवायला देतो. पुण्यात एका हॉटेलच्या मालकाने क्रूरतेची पराकाष्टा ओलांडली असून भिकाऱ्यांना क्रूरतेची वागणूक देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात भिकाऱ्यांच्या दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. 

ही घटना आहे पुण्यातील सासवड येथील. पुण्यातील सासवड परिसरात निलेश जयवंत जगताप यांचे हॉटेल आहे. 23 मे रोजी त्यांच्या हॉटेलच्या ओसरीवर तीन भिकारी येऊन बसले होते. ते तिघे सारखेच ओसरीवर येऊन बसत होते त्यामुळे हा राग निलेशच्या मनात होता. वारंवार सांगून देखील ते तिघे ओसरीवर बसत होते. या रागाच्या भरात निलेश ने त्यांना अद्दल घडवायचे ठरवले आणि तिघांना काठीने मारहाण केली. मारहाणीमुळे ते तिघेच जागीच निपचित पडले. एवढा मार खाऊन देखील ते अजून गेले का नाही हे पाहण्यासाठी निलेश ने त्यांच्या अंगावर उकळत पाणी ओतलं. 

अंगावर गरम उकळतं पाणी पडल्यामुळे ते तिघे भाजले आणि त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अद्याप निलेशच्या विरोधात कोणतीही पोलीस कारवाई करण्यात आलेली नाही.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर 53 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोलकाता येथील हॉटेलमध्ये आग, 14 जणांचा मृत्यू

मुंबईत 'वेव्हज 2025' जागतिकशिखर परिषदशिखर परिषद आयोजित केली जाईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments