Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील हडपसरात झाडाची फांदी अंगावर पडल्याने डबेवाल्याचा मृत्यू

death
Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (16:16 IST)
काळ कधी आणि कुणावर झडप टाकेल हे सांगणे कठीण आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हांडेवाडी येथील आदर्श नगर येथे ट्रकची धडक लागून झाडाची फांदी तुटून एका डबेवाल्याचा डोक्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंडित पाटील असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी  महापालिकेच्या घनकचरा वाहून नेणाऱ्या ट्रक चालक उद्यान विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गीता पंडित यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता पंडित यांचे खानावळ आहे. त्यांचे पती पंडित पाटील हे दुचाकीवरून डबे घेऊन सातवनगर येथून जात असताना ट्रक चालकाने फांदीला धडक दिली आणि फांदी पडून मागून येणारे पंडित पाटीलांच्या डोक्यावर पडली. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भीषण स्फोट मध्ये 406 जखमी, अनेकांचा मृत्यू

ठाकरे गटाला निमंत्रण दिल्याने मनसेवर भाजप नाराज, बैठकीला उपस्थित राहण्यास दिला नकार

LIVE: ठाकरे गटाला आमंत्रित केल्याबद्दल मनसेवर भाजप नाराज

"कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घेतला पाहिजे" पाकिस्तान गप्प बसणार नाही- नेते शरद पवार

वीर सावरकरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले

पुढील लेख
Show comments