Dharma Sangrah

सावधान : पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, नवे ३८४ जण पॉझिटिव्ह

Webdunia
गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (08:48 IST)
दिवाळीनंतर पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागली आहे. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये साधारणत: १४ टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. दिवसभरात २ हजार ७४३ जणांची कोरोना चाचणी केली. यापैकी ३८४ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
 
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे. १० टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता  १३ टक्क्यांच्या आसपास गेला आहे.
 
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३९२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २६० जण व्हेंटिलेटरवर आहेत, तर एक हजाराच्या आत आलेली ऑक्सिजनवरील रुग्ण संख्या पुन्हा एक हजारांच्या पुढे गेली  आहे. आतापर्यत  १ हजार १ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. बुधवारी ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी एकजण पुण्याबाहेरील आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: डिसेंबरच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Badminton आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ५१ धावांनी पराभव केला

लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण? बांगलादेशी खेळाडूवर गंभीर आरोप; आरोपपत्र दाखल

पुढील लेख
Show comments