Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सट्ट्यात हरलेल्या 4 लाखांच्या वसुलीसाठी अपहरण ! जबरदस्तीने ऐवज काढून घेतला, कोंढव्यातील घटना

Webdunia
मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (15:33 IST)
मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यातील तब्बल ४ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी पाच जणांनी तरुणाचे अपहरण करुन त्याच्या खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेऊन जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
 
राजेंद्र संगय्या हिरेमठ (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभय जोगदंड (वय ३०, रा. अपर डेपो, बिबवेवाडी),अभी बाळशंकर (वय ३२, रा. काकडेवस्ती, कोंढवा) आणि त्यांच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार १० सप्टेबर, १८ व १९ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी  व कोंढव्यात घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईल वर खेळलेल्या सट्ट्यामध्ये ३ लाख ९६ हजार रुपये हरले होते.हे पैसे परत देत नाही, म्हणून आरोपींनी प्रथम १० सप्टेबर रोजी त्यांना आमचे पैसे आताच्या आता दे नाही तर तुला उचलून नेतो व तुझे हात पाय तोडतो,अशी धमकी दिली होती.
त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट येथे फिर्यादी यांच्या पत्नी करुन फिर्यादीचा मोबाईल व पर्वतीतील जनता वसाहत येथे लावलेल्या भिशीच्या संबंधाने करायच्या केसची कागदपत्रे घेतली.फिर्यादी यांना चारचाकी गाडीत घालून त्यांचे अपहरण केले.गाडीत पाईप़ कमरेचा पट्टा, वायर व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune Crime) केली.त्यांच्या खिशामधील अर्धा अर्धा तोळे वजनाच्या ८ सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावलेअसा १ लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments