Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हनीट्रॅप करून झाला पसार; वर्षभराने अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Webdunia
गुरूवार, 19 मे 2022 (07:37 IST)
हनीट्रॅपच्या गुन्ह्यामध्ये गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या आरोपी सागर साहेबराव खरमाळे (वय 35 रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रूपयांचे दोन मोबाईल जप्त केले आहे.
 
आरोपी खरमाळेने एका महिलेसह त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने एका अधिकार्‍यावर हनीट्रॅप करून फसवले होते. तसेच अधिकार्‍याकडे वारंवार दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात येत होती. नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
 
आरोपी खरमाळे बोल्हेगाव परिसरात येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून आरोपी खरमाळेला अटक केली.
 
सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, पोलीस अंमलदार दिनकर घोरपडे, संतोष लगड, सचिन वणवे, राहुल शिंदे, जयश्री फुंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments