Marathi Biodata Maker

किळसवाणा प्रकार : समोसा मध्ये कंडोम टाकला, कंत्राट परत मिळवण्यासाठी केला प्रकार

Webdunia
बुधवार, 10 एप्रिल 2024 (09:55 IST)
पुणे : पुण्यातून किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या कॅन्टीनचे कंत्राट दुसऱ्या ठेकेदाराला मिळाले होते. ते परत आपल्याला मिळावे यासाठी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये समोस्यात कंडोम टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका कामगाराला अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, औंध येथील एक कंपनी खाद्यपदार्थ पुरवण्याचे कंत्राट घेते. ही कंपनी पिंपरी चिंचवडमधील एका नामांकित कंपनीचं कॅन्टीन चालवायची. या कंपनीने सुरुवातीला एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीला कंत्राट दिले होते. मात्र एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीने पुरविलेल्या समोस्यामध्ये प्रथमोपचार पट्टी आढळून आल्यामुळे त्यांच्यासोबत समोसा पुरविण्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आणि त्यांच्याजागी मनोहर इंटरप्रायजेस या कंपनीसोबत करार करण्यात आला. ही बाब एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीच्या मालकाला समजताच त्यांनी कट रचला.
 
रहीम शेख, अझर शेख आणि मजहर शेख या एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीच्या तिन्ही मालकांनी आपल्या कटात फिरोज शेख आणि विक्की शेख या कामगारांना सहभागी करून घेतले. या दोन्ही कामगारांना विश्वासात घेऊन आरोपी मालकांनी त्यांना मनोहर इंटरप्रायजेस या कंपनीत कामाला पाठवले. या कामगारांनी एसआरएस कंपनी मालकांनी सांगितल्याप्रमाणे समोसमध्ये  कंडोम, तंबाखूजन्य पदार्थ आणि दगडं भरले.

हे समोसे नामांकित कंपनीच्या कॅन्टीन मध्ये पोहचले. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी जेव्हा हे समोसे खाल्ले तेव्हा हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला. याप्रकरणी औंध येथील खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरने पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानुसार चिखली पोलिसांनी फिरोज या कामगाराला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट; विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली

राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे; महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट

काजवा महोत्सव: भंडारदरा आणि घाटघर परिसरात होणाऱ्या प्रसिद्ध काजवा महोत्सवाची तयारी सुरू झाली असून, १६ मे पासून पर्यटकांसाठी हे खास आकर्षण खुले होणार

राहुल द्रविडची युरोपियन टी२० प्रीमियर लीगच्या (ETPL) डब्लिन गार्डियन्स फ्रँचायझीचा मालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

PBKS vs DC: दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला हरवून गुणतालिकेत बदल घडवला

पुढील लेख