Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलानेच चोरले घरातील सव्वासहा लाखांचे दागिने; मुलासह पाच जणांना अटक

Webdunia
सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (15:30 IST)
पुण्यातील वाकड मुलानेच घरातून सहा लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.याप्रकरणी मुलगा व त्याचे तीन साथीदार तसेच चोरीचे दागिने विकत घेणारा व्यावसायिक,अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 13 एप्रिल ते 24 सप्टेंबर 2021 या कालावधीत जय मल्हार नगर,थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा मुलगा वैष्णव कालिदास शेळके (वय 23रा.मल्हार नगर) याच्यासह त्याचे साथीदार हर्षद शांताप्रकाश शास्त्राना (वय 20, रा. थेरगाव), हर्षद सुरेंद्र कांबळे (वय 18, रा. थेरगाव),अनिकेत दीपक सुतार (रा.वाकड) तसेच चोरीचे दागिने खरेदी करणारा विजय रामचंद्र विस्पुते (विजय ज्वेलर्स,पिंपळे निलख, सांगवी)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरातील पिवळ्या धातूचे दागिने फिर्यादीचा मुलगा वैष्णव शेळके व त्याच्या तीन साथीदारांनी चोरी केले. फिर्यादीचे सहा लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने आरोपींनी चोरून नेले. ते सोन्याचे दागिने चोरीचे आहेत,असे माहीत असतानाही आरोपी विजय विस्पुते याने दागिने खरेदी केले.
दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

बीएमसी निवडणुकी संदर्भात संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं

बायो-बिटुमेनवर आधारित देशातील पहिल्या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन

शाळेतील शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शिक्षकाला अटक

मंदिर-मशीद मुद्द्यावर संजय राऊत यांनी दिले मोठे विधान, मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला

LIVE: शिवसेना युबीटी BMC निवडणूक एकट्याने लढवणार! संजय राऊतांनी दिले संकेत

पुढील लेख
Show comments