Festival Posters

मोशीत झाडाला लटकलेले दोन मृतदेह आढळले

Webdunia
शनिवार, 12 एप्रिल 2025 (18:04 IST)
पुण्यातील मोशी येथे खिरीड वस्ती परिसरात भारतमाता चौकाजवळ शनिवारी 12 एप्रिल रोजी सकाळी एका झाडाला दोन पुरुषांचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भोसरी पोलीस प्रकरणाचा तपास करत असून अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. 
ALSO READ: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी
सदर घटना आज शनिवारी सकाळी भारतमाता चौकाजवळ खिरीड वस्ती परिसरातील आहे. लिंबाच्या एका झाडाला एकाच फांदीला दोन युवकांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले.मयतांची ओळख पटलेली असून दोघेही मित्र होते. तुषार ढगे आणि सिकंदर सल्लाउद्दीन शेख असे यांची नावे आहे. हे दोघे अहमदनगर रहिवासी आहे. हे दोघे कालच मूळ गावावरून पुण्यात आले होते. मयत तुषार ढगे यांच्या चुलत्याला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. 
ALSO READ: पुणे : आईने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या, जुळ्या मुलांना पाण्यात बुडवून केली हत्या
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. दोघांचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या हे समजू शकले नाही. या बाबत अधिक तपास सुरु असून आत्महत्येचा कोणताही निष्कर्ष स्पष्ट झालेला नाही. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: पुण्यात 'ई-फायलिंग' प्रणाली सुरू,वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे 3,560 गुन्हे दाखल

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: मनसे उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेना-भाजपमध्ये जाईल?

अजित पवार यांच्या निधनानंतर अनावश्यक राजकारणावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली

T20 World Cup विश्वचषकात खाते उघडू न शकलेला अभिषेक पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर इशान पहिल्या १० मध्ये सामील

मुंबईत मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली

पुण्यात लग्नाच्या चार दिवस आधी वधूचे अपहरण! आई आणि भावाचे डोळ्यात मिरची पावडर फेकली

पुढील लेख
Show comments