Festival Posters

पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाने मागितली माफी, पोलिसांनी अटक केली

Webdunia
रविवार, 9 मार्च 2025 (13:55 IST)
पुण्यात ट्रॅफिक सिग्नलवर लघुशंका करणाऱ्या तरुणाने जाहीर माफी मागितली असून मला एक संधी द्या म्हणत व्हिडीओ बनवला. या व्हिडीओ मध्ये त्याने जनतेची आणि सरकारची माफी मागितली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
ALSO READ: पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून श्रीमंत वडिलांच्या मुलाने केली रस्त्याच्या मधोमध लघुशंका
तो व्हिडिओमध्ये म्हणाला, कालच्या घटनेची मला खूप लाज वाटते. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अटकेच्या पूर्वी व्हिडीओ बनवला आहे. मला कालच्या घटनेची खूप लाज वाटते. मी पुणे आणि महाराष्ट्र आणि भारतातील लोकांची माफी मागतो. मी पोलीस विभाग आणि एकनाथ शिंदे साहेबांची माफी मागतो. कृपया मला माफ करा आणि मला एक संधी द्या. हे पुन्हा कधीही घडणार नाही. 
ALSO READ: पुणे : घरात भांडण झाले व्यक्तीने पेटवली १३ वाहने
घटनेनंतर गौरव आहुजा 8 मार्च रोजी पुण्याहून कोल्हापूरला गेला.कोल्हापुरात प्रवेश करण्यापूर्वी त्याने आपली बीएमडब्ल्यू थांबवली आणि धारवाडला जाण्यासाठी दुसरे वाहन भाड्याने घेण्यासाठी एका स्थानिक ऑटो चालकाची मदत घेतली आणि संकेश्वरला पोहोचल्यावर त्याने ड्रॉयव्हरला त्याला पुण्याला घेऊन जाण्यास सांगितले आणि पुण्यात परतल्यावर त्याने चालकाला माफी मागण्याचा व्हिडीओ बनवण्यासाठी विनंती केली आणि माफी मागण्याचा व्हिडीओ बनवला आणि पोस्ट करून मित्रांना पाठवला.
 
तरुणाला सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या सोबत असणाऱ्या त्याच्या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या वेळी दोघेही मद्यधुंद असल्याचा पोलिसांना संशय आहे. 
ALSO READ: पुण्यामध्ये चाकूचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
पोलिसांनी गौरव आहुजाच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर सार्वजनिक उपद्रव, बेदरकारपणे वाहन चालवणे आणि सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणे याचा समावेश आहे. 

Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संगम: सोमनाथच्या पुरातत्वीय अवशेषांमधून कोरलेली दिव्य शिवलिंगे महाकाल मंदिरात पोहोचली

जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

बोगस मतदार दिसले तर मनसे स्टाईल ने कारवाई करण्याचा संदीप देशपांडे यांचा इशारा

LIVE: पुण्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक, भव्य लॉजिस्टिक पार्क उभारणार

जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बांधले जाणार

पुढील लेख