suvichar

पंजाबी समोसा

Webdunia
साहित्य : अर्धा किलो मटरचे दाणे, ३-४ फ्लॉवरची फुले, अर्धे छोटे लिंबू, ७-८ मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, कोथिंबिर, १ चमचा धने-जिरे पावडर, १ चमचा तिखट, हळद, हिंग, मीठ, साखर, २ वाट्या मैदा, तळण्यासाठी तेल. कूकरमध्ये मटरचे दाणे व बटाटा शिजवावे, नंतर मैद्यात तिखट, धनेजीरे पूड, थोडी हळद व हिंग, भाजलेले तीळ, चवीपुरते मीठ, चिरलेली कोथिंबीर व अर्धी वाटी तेल गरम करून त्यावर ओतावी. हे सर्व मिश्रण कालवून मैदा घट्ट भिजवावा आणि तो २ तास मुरवत ठेवावा.

बटाटे कुस्करून घ्यावेत. फ्लॉवरची फुले बारीक चिरावी. त्यानंतर मटार, कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा लसूण, मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, चिरलेले फ्लॉवर यामध्ये थोड लाल तिखट, हळद, हिंग, धनेपूड, चवीप्रमाणे मीठ व लिंबू पिळून सर्व मिश्रण परत एकसारखे कालवून घ्यावे.

भिजवलेल्या मैद्याचा छोटा गोळ घेऊन सर्वात पातळ व मोठी पोळी लाटावी. या पोळीचे तीन भाग करावे. तीन पट्ट्यांवर मटारचे केलेले सारण घालून खणासारखी त्रिकोणी घडी करावी. याप्रमाणे सर्व समोसे करून घेतल्यानंतर गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तेलात तेळावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

कमी तेलात तयार होते आणि डाएट करणाऱ्यांसाठीही उत्तम खमंग आणि पौष्टिक काकडी टिक्की रेसिपी

सतत थकवा जाणवतो का मग या 3 चाचण्या करा

career in cyber security and ethical hacking सायबर सिक्युरिटी आणि एथिकल हॅकिंग मध्ये करिअर करा, पात्रता जाणून घ्या

ब्राइडल ग्लो मिळवण्यासाठी या टिप्सचा अवलंब करा

प्रेरणादायी कथा : गुराखी आणि बैलाची गोष्ट

पुढील लेख
Show comments