Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या सोमवारपासून नाशिक मनपाच्या १०० नव्या सिटी बस धावणार!

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (12:29 IST)
नाशिक महापालिकेच्या  ताफ्यात आता १०० नव्या सीएनजी सिटीलिंक बस  येणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारा पाथर्डी फाटा येथील सीएनजी गॅस प्रकल्पही सुरू झाला आहे. या निर्णयामुळे शहरातील सिटी बसची संख्या वाढणार असून सोबत इतक्या दिवस तोट्यात असणाऱ्या व्यवस्थापनाला आर्थिक बळही मिळणार आहे.
 
नाशिकमध्ये सिटीलिंक बससेवेची सुरुवात झाल्यानंतर पाच टप्प्यात २५० बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे. सध्या सीएनजीवर चालणाऱ्या १०० आणि डिझेलवर चालणाऱ्या ५० बस आहेत. उर्वरित १०० बसला सीएनजी मिळत नसल्याने त्या बंद होत्या. मात्र, पाथर्डी येथील महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने ०२ मार्च रोजी प्रकल्पाचा नारळ फोडला. त्यामुळे महापालिकेचा बस सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला.
 
दरम्यान पाथर्डी येथील गॅस प्रकल्प सुरु झाला असून रविवारी महापालिकेला १२०० किलो इतके सीएनजी मिळणार आहे. त्यानुसार येत्या सोमवारी १५ बस सुरू होणार आहेत. एप्रिलपर्यंत १२००० किलो सीएनजी मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरात १०० सीएनजी बस रस्त्यावर धावणार आहेत. नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दिवसाकाठाचे उत्पन्न वाढूनही सेवा तोट्यात जात होती. आता सीएनजीवर सिटी बस धावल्या तर इंधन खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे बस व्यवस्थापनाचा तोटाही कमी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

रामलल्लाच्या प्राण प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन, अयोध्येच्या राममंदिरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन

LIVE: मुंबईतील जुहू परिसरात चार बांगलादेशी नागरिकांना अटक

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांशी असलेल्या जवळीकतेवर टीकास्त्र सोडले

शरद पवार खूप हुशार आहे, आरएसएसचे गुणगान गाण्यामागील हाच हेतू आहे, देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा

राज्य आर्थिक संकटातून जात आहे, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments