Festival Posters

पालखीमध्ये कंटेनर घुसून ४ वारकरी ठार

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (08:16 IST)
शिर्डीहून आळंदीला जाणा-या पालखीत कंटेनर घुसल्याने चिरडून चार वारक-यांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ब-याच जणांची प्रकृती गंभीर आहे. नाशिक-पुणे महामार्गावर ही घडली. पायी चालणा-या वारक-यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. या दिंडीत भरधाव वेगात येणारे एमएच १२ व्हिटी १४५५ कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आणि या अपघातात चार वारक-यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
 
अपघातानंतर घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. अपघातात वारकरी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातातील जखमी आणि मयतांची ओळख पटली असून त्यांची नावेदेखील समोर आली आहेत.
 
जखमींमध्ये बिजलाबाई शिरोळे (रा. वाळकी ता. राहता), राजेंद्र कारभारी सरोरे (रा. माळी ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड, ओंकार नवनाथ चव्हाण (रा. मढी सूर्य, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोगरे (रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापके (रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळ (रा. अकोला), मिराबाई मारुती ढमाले (रा. वावी ता. सिन्नर) यांचा समावेश आहे.
 
मृतांची नावे
-बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव)
-बबन पाटीलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी)
-भाऊसाहेब नाथा जपे (रा.कनकोरी, ता. राहता)
-ताराबाई गंगाधर गमे (रा.को-हाळे, ता. राहता)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री होतील का?

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री होतील का? फडणवीस यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी याबाबत संकेत दिले

Ajit Pawar plane crash बारामती अपघाताचे सत्य ब्लॅक बॉक्स उघड करेल, दिल्लीत मोठी कारवाई सुरू, एएआयबी चौकशीत गुंतले

मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

विमान वाहतूक मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून अपघाताच्या चौकशीत सहकार्य मागितले

पुढील लेख
Show comments