Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये प्रसिद्ध डॉक्टरची 65 लाख रुपयांची फसवणूक

Webdunia
सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (07:51 IST)
65 lakh rupees fraud of a famous doctor in Nashik - मालकीची जमीन असल्याचे भासवून विश्‍वास संपादन करून नोटरी, साठेखत, करारनामा करून देत शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरला चार भामट्यांनी 65 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपी हे खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार आहेत.
 
याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टर आहेत. दरम्यान, हे फिर्यादी डॉक्टर व त्यांचे पार्टनर हे जागेच्या शोधात होते.
 
त्यादरम्यान, संशयित मध्यस्थ अरुण भागवत पाटील (मयत), जगदीश कारभारी गावंड (वय 51, रा. अंबड, नाशिक), सोमनाथ काशीनाथ मंडलिक (वय 51, रा. आनंदवल्ली, नाशिक) व दत्तात्रय काशीनाथ मंडलिक (वय 50, रा. चेहेडी नाका, नाशिकरोड) यांनी संगनमत करून कटकारस्थान रचले. त्यानंतर फिर्यादी डॉक्टर व त्यांचे पार्टनर यांच्याशी संपर्क साधून त्यांना मौजे आनंदवल्ली शिवारात स्वत:च्या मालकीची जमीन असल्याचे सांगितले, तसेच आरोपींनी डॉक्टरांशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांचा विश्‍वास संपादन केला.
 
अखेर या जमीन खरेदीचा व्यवहार ठरला. आरोपी अरुण पाटील, जगदीश गावंड, सोमनाथ मंडलिक व दत्तात्रय मंडलिक यांनी फिर्यादी डॉक्टर व त्यांचे पार्टनर यांच्या लाभात नोटरी, साठेखत, करारनामा व भरणा पावती केली. त्यानंतर आरोपींनी डॉक्टर व त्यांच्या साक्षीदाराकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने एकूण 65 लाख रुपये रोख स्वरूपात, तसेच आरटीजीएस व धनादेशाद्वारे दिले; मात्र प्रत्यक्षात ही जमीन आरोपींच्या मालकीची नसल्याचे उघड झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
 
त्यानंतर डॉक्टरांनी या चारही आरोपींशी संपर्क साधून दिलेली रक्कम परत करण्याची मागणी केली; मात्र हे चारही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला, तसेच फसवणूक करून 65 लाख रुपयांचा अपहार केला. हा प्रकार दि. 30 जून 2015 ते दि. 29 ऑक्टोबर 2021 यादरम्यान आरोपी यांच्या आनंदवल्ली येथील राहत्या घरी, तसेच एका नामांकित हॉटेल व एका वकिलाच्या कार्यालयात घडला.
 
आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर डॉक्टर व त्यांच्या पार्टनरने गंगापूर पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

5 वर्षाच्या पोटाच्या मुलीची गळा दाबून हत्या, आईला करायचे होते दुसरे लग्न

Assembly Election Result : पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

नवज्योतसिंग सिद्धूने पत्नी कर्करोगमुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला

पुढील लेख
Show comments