Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, 8 वर्षाच्या मुलाची 12 वर्षाच्या सख्या भावाने केली हत्या

Webdunia
बुधवार, 12 मे 2021 (11:29 IST)
सातारामधील  खंडाळा तालुक्यातील 8 वर्षाच्या लहान मुलाची  निर्घृण हत्या करण्यात आली आहे. डोक्यात आणि गळ्यावर वार करून ही हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ही हत्या 12 वर्षाच्या सख्या भावाने केली असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मात्र या अल्पवयीन मुलाने हा खून का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही .
 
खंडाळा तालूक्यातील 8 वर्षीय लहान मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता.  सायंकाळी बराच उशीर होऊनही मुलगा घरी न आल्याचे पालकांच्या लक्षात आले. काळजीपोटी नातलग आणि शेजाऱ्यांनी शोधा शोध सुरू केली.  
 
मुलाचा शोध घेत असताना घराजवळच्या पपईच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्या डोक्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले. संबधित घटना पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची आणि चौकशीची चक्र फिरवली. त्यानंतर मुलाच्या 12 वर्षीय सख्या भावानेच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

100 फूट खोल दरीत पर्यटकांची कार पडली, 8 जण गंभीर जखमी

मोदी सरकार संरक्षक कवचप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, अमित शहांचा दावा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लालूंवर ताशेरे ओढले, नितीशच्या पलटवारावर म्हणाले- मुंगेरीलाल यांची स्वप्नेच राहतील

मनू भाकर-गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न

LIVE: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांची मोठी मागणी, बीडबाहेर सुनावणी व्हावी

पुढील लेख
Show comments