Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेवगावातील गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग

Webdunia
रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (11:47 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावतील बाभुळगाव येथे गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग लागली. कारखान्यातील डिस्टिलरी विभागात ही घटना घडली. कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीचे कारण इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याचे सांगितले  जात आहे. या   आगीमध्ये कारखान्याचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. नेहमी प्रमाणे काम करत असताना डिस्टिलरी विभागाला अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे गोंधळ उडाला अनेक कामगार जीव मुठीत घेऊन कारख्यातून बाहेर पडले. आगीची घटना घडताच अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु झाले.या अपघातात सहा कामगार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी ठराविक कालावधीत छोटे छोटे स्फोट होत आहे.  
सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून कारखान्याच्या परिसरातील नागरिक, कामगार, कर्मचारी यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments