Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग, अनेक घरे जळून खाक

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (11:46 IST)
मुंबईतील गोवंडी -शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरात झोपडपट्टीला शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीन रौद्र रूप धारण करत परिसरातील अनेक घरे जळून खाक केली. या आगीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहे. 
 
आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब  घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.सुदैवाने या आगीत कोणती जन हानी झाली नाही. मात्र स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात नागरिकांची मोठी वर्दळ आहे.  
 
आज सकाळी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास काही झोपड्यांना आग लागली. आग लागल्याचे समजल्यावर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरु केला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण करत परिसरातील इतर घरांना विळखा घातला आणि इतर घरे देखील जळून खाक झाले.
 
स्थानिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत धाव घेतली. आपली घरे आगीच्या भक्षस्थानी होताना त्यांचे अश्रू अनावर झाले. 
 
अग्निशमन दलाने माहिती मिळतातच तातडीनं घटनास्थळी धाव घेत पोलिसांसह पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला .
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

लहान मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक

रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 1.31 केली कोटींची फसवणूक

दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अखिलेश यादव जाहीर सभेला संबोधित करणार

अंबरनाथमध्ये पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी फरार आरोपीला वाराणसी येथून अटक

आता पगारातून TDS कापला जाणार नाही, हे काम करावे लागणार

पुढील लेख
Show comments