Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकच्या गरोदर महिला डॉक्टरने स्वतः ॲम्बुलन्स चालवून वाचवले रुग्णाचे प्राण!

Webdunia
शनिवार, 1 एप्रिल 2023 (08:40 IST)
social media
विष प्राशन केलेल्या तरुणासाठी नाशिकमधील एक महिला डॉक्टर अक्षरशः देवदूत ठरली आहे. डॉक्टर महिलेने गरोदर असूनही जीवाची बाजी लावत तरुणाला जीवदान दिले. रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याने स्वतः गर्भवती महिला डॉक्टरने कुठलाही विचार न करता रुग्णवाहिका चालवत नेली आणि तरुणाचे प्राण वाचवले.
 
म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पवार यांनी गरोदर अवस्थेतही विष प्राशन केलेल्या तरुणाचे स्वतः ॲम्बुलन्स चालवून प्राण वाचवले.
 
प्राथमिक आरोग्य केंद्र माळसाकोरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पवार या मंगळवारी ड्युटीवर असताना सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान मांजरगाव येथील 27 वर्षे युवकाने विष प्राशन केलेल्या अवस्थेत त्याला दाखल केले.
ड्युटीवर असलेला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णाला पुढील उपचाराची गरज होती.
 
प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका असून देखील त्याचा चालक रजेवर असल्याने रुग्णाला निफाड येथे उपचारासाठी नेणे गरजेचे होते परंतु डॉक्टर प्रियांका पवार या गरोदर अवस्थेत आहे त्यांनी मागचा पुढचा विचार न करता रात्री साडेआठ वाजता आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेऊन स्वतः रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून स्टेरिंग हातात घेतले रुग्णाचा जीव वाचवणे हाच महत्त्वाचा  हेतू डोळ्यासमोर होता.
 
ॲम्बुलन्स चालवायचा अनुभव नसल्याने हळूहळू निफाड ग्रामीण रुग्णालय एक ते सव्वा तासात गाठले. रुग्णाला ताबडतोब पुढील उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचल्याने मनाला समाधान वाटले. या घटनेचे डॉक्टर प्रियांका पवार यांचे परिसरात कौतुक होत आहे.
 
“नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना मंगळवारी सायंकाळी विष प्राशन केलेल्या रुग्ण दाखल झाला. रुग्णाची तब्येत गंभीर होती त्याचे प्राण वाचवणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते मी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी निफाड येथे नेणे गरजेचे होते माझी परिस्थिती बाजूला ठेवून मी स्वतः रुग्णवाहिकेवर चालक म्हणून सारथी ची भूमिका केली. माझ्या या छोट्याशा प्रयत्नामुळे रुग्णाचे प्राण वाचले हे माझ्या दृष्टीने जीवनातील खूप खूप महत्त्वाचे आहे.” – डॉ. प्रियंका पवार. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मतदारांचे आभार

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

5 वर्षाच्या पोटाच्या मुलीची गळा दाबून हत्या, आईला करायचे होते दुसरे लग्न

Assembly Election Result : पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

पुढील लेख
Show comments