Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मागील भांडणाचा राग धरून मित्राने काढला काटा, टोळीयुद्धाचा थरार

Webdunia
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (07:50 IST)
मागील भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर दोघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवत त्याचा खून  केल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरात घडली आहे.
 
मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील गोल्डन नगर भागातील हॉटेल शकील लगत ही थरारक घटना घडली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे.      
 
मालेगाव शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचे प्रयत्न, जबरी लुट, हाणामाऱ्याची प्रकरणे वाढली आहेत.
 
अशातच मालेगाव शहरातील गजबजलेल्या गोल्डननगर भागात आज पहाटेच्या सुमारास एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली.
 
सलमान अहमद सलीम अहमद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सलमान याच्यावर तौसीफ अहमद जब्बार अहमद  उर्फ राजू तसेच त्याचा साथीदार अकील अहमद मोहम्मद सुगराती  उर्फ पापा या दोघांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्रांनी वार केले. पोटावर पाठीवर तसेच मानावर व चेहऱ्यावर सपासप वार केल्याने वर्मी घाव लागून सलमान रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळून गतप्राण झाला. सलमान मृत झाल्याचे पाहून तौसिफ व अकीलने घटनास्थळावरून पलायन केले.
 
दरम्यान खुनाच्या घटनेची माहिती मिळताच अपो अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक प्रदीप जाधव, पवारवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि डी जे बडगुजर उपनिरीक्षक नाजीम शेख आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या शोधार्थ सर्वत्र नाकाबंदी केली गेली. तौसिफ व अकील मनमाडकडे पळाले असल्याचे कळताच पोलीस पथकाने मनमाड येथे धाव घेतली.
 
पवारवाडी पोलिसांनी तातडीने सापळा रचून स्टेशनवर रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी मृत सलमानचे वडील मोहम्मद सलीम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर तौसिफ व अकील या दोघांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता 12 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments