Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जन्मानंतर अवघ्या 6 मिनिटात आधार क्रमांक

Webdunia
उस्मानाबाद- तुम्ही तुमचे आधार कार्ड काढले आहे का? नसेल तर या मुलीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा आणि तातडीने आधार कार्ड काढा. भावना संतोष जाधव या मुलीचा जन्म महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका रूग्णालयात गत रविवारी दुपारी 12 वाजून 3 मिनिटांनी झाला. त्यांनतर 12 वाजून 9 मिनिटांनी तिला आधार क्रमांक मिळाला. जन्म झाल्यानंतर अवघ्या 6 मिनिटात तिला तिचा आधार नंबर मिळाला आहे.
 
तिच्या आई वडिलांनी याबाबत सजगता दाखवल्याने हे शक्य झाले आहे. भावनाच्या आई वडिलांनी तिच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. त्यानंतर त्यांना तिला जन्माचा ऑनलाइन दाखला आणि आधार नंबर मिळाला. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे तातडीने तिच्या जन्माची नोंद करण्यात आली अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.
 
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले. लवकरच आम्ही सगळ्या लहान मुलांचे आधार क्रमांक त्यांच्या आई वडिलांच्या आधार क्रमांकाशी जोडणारर आहोत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments