Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगली : अपघातामध्ये ६ पैलवानांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:12 IST)

सांगली-कडेगाव येथील वांगी येथे ट्रॅक्टर आणि क्रुझर जीप या वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून त्यात ६ पैलवानांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिरगांव फाटा येथे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. साताऱ्यातील औंध येथे कुस्ती स्पर्धेत खेळून परतताना हा अपघात घडला.  आकाश देसाई, विजय पाटील, सौरभ माने आणि शुभम घारगे अशी मृत पैलवानांची नावे आहेत.

एका ट्रॅक्टरला पैलवानांना घेऊन जाणाऱ्या क्रुझर जीपने समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात ५ पैलवानांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर ५ जणही गंभीर जखमी झाले आहेत. जीपमधून एकूण अकरा जण प्रवास करीत होते.  या भीषण अपघातात क्रुझर जीपचा चक्काचूर झाला असून ट्रॅक्टरचा मागचा टायरही फुटला. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments