Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात महाविकास आघाडीच ओपिनियन पोल, आघाडीला मिळू शकतात 26 ते 28 जागा

Webdunia
मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (17:54 IST)
लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 19 ते 21 जागा तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 26 ते 28 जागा पडण्याचा अंदाज आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला फारसे यश मिळताना दिसत नाही.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37 टक्के आणि महाविकास आघाडीला 41 टक्के मते मिळू शकतात.
 
देशातील लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. तीन ते चार महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजप आणि काँग्रेससह देशभरातील इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली. यादरम्यान सी-व्होटरने सर्वेक्षण केले. लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर कोणाचा विजय किंवा पराभव झाला असता असा प्रश्न विचारण्यात आला. देशातील 5 मोठ्या राज्यांतील जनमत चाचण्यांचे आकडे धक्कादायक आहेत. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा समावेश करून लोकसभेच्या एकूण 223 जागा आहेत. या जागांवरच्या विजयामुळे देशात कोणाची सत्ता येणार हे ठरते. या राज्यांतही इंडिया आघाडीच प्रबळ ठरत आहे.
 
महाविकास आघाडीला फायदा
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. ओपिनियन पोलमध्ये काँग्रेस आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. आज जर महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली तर भाजप+आघाडीला 19 ते 21 जागा मिळतील तर काँग्रेस आणि मित्र पक्षाला 26 ते 28 जागा मिळतील तर इतरांना 0-2 जागा मिळतील, असा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीनुसार भाजप आघाडीला 37 टक्के, काँग्रेस आणि मित्रपक्षाला 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळू शकतात.
 
चार राज्यांतील ओपिनियन पोल
 
पंजाबमध्ये कॉंग्रेसला लाभ
पंजाब : लोकसभेच्या13 जागा : आज निवडणुका झाल्या तर भाजपला 2, काँग्रेसला 5-7, आपला 4-6 जागा आणि शिरोमणी अकाली दलाला 2 जागा मिळू शकतात.
प. बंगालमध्ये तृणमूल
प. बंगाल : एकूण जागा 42 : यात तृणमूल काँग्रेसला 23 ते25, भाजपला 16-18 जागा आणि काँग्रेस आघाडीला 0-2 जागा मिळू शकतात.
 
बिहारमध्ये आघाडी
बिहार : एकूण 40 जागा : येथे काँग्रेस आघाडीला 21 ते 23, भाजपला 16-18 जागा आणि इतरांना 2 जागा मिळू शकतात.
 
यूपीत भाजप
उत्तर प्रदेश : 80 जागा : यात एनडीएला 73-75,, काँग्रेस+सपाला 4-6 जागा आणि बसपाला 0-2 जागा मिळू शकतात.
 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments