Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर नाचवण्यापाठोपाठ आता शाळा आवारात बाटल्या, सलाइनचा खच

Webdunia
गुरूवार, 22 जून 2023 (21:32 IST)
नाशिक  विनाअनुदानित खासगी शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर नाचवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या शाळेच्या आवारात मद्याच्या व अौषधांच्या बाटल्या तसेच सलाइनचा खच असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी एल्गार संघटनेचे भगवान मधे यांनी केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिखलवाडी (ता.त्र्यंबकेश्वर) येथील इंग्रजी माध्यमचे निवासी सर्वहारा परिवर्तन केंद्र येथे आदिवासी समाजाच्या २२ मुली शिक्षण घेतात. संस्थाचालक राजू ऊर्फ बंदीराज नाईक आणि शिक्षिका माधुरी गवळी मुलींना बळजबरीने शाळेच्या आवारातील कॅन्टीनच्या मोकळ्या आवारात पारंपरिक नृत्य करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप पीडित पाच मुलींनी केला आहे.
वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात संशयित संस्थाचालक नाईक आणि शिक्षिका गवळी यांच्याविरोधात बालकांचे संरक्षण कायदा अधिनियम आणि अॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला बालहक्क आयोग वसतिगृहात : महिला बालहक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, तहसीलदार आणि उपअधीक्षक भामरे यांनी वसतिगृहाला बुधवारी भेट देत मुलींकडून माहिती घेतली.
चिखलवाडीला छावणीचे स्वरूप चिखलवाडीच्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments