Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर नवरी पसंत नाही म्हणणार्‍या मुंबईच्या वऱ्हाडाला चांगलेच धुतले

Webdunia
गुरूवार, 16 जून 2022 (15:53 IST)
औरंगाबाद- विवाह संपन्न झाला आणि नंतर नवरदेव म्हणाला की मुलगी पसंत नाही, तिला सोबत घेऊन जाण्यास नकार दिल्याने नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडाला चांगलेच धुतले. वरात घेऊन आलेल्या गाड्या फोडल्या आणि इतका वाद घडल्यानंतर नवरीला न घेताच वर्‍हाड मुंबईला निघून गेले. नंतर मुलीचे लग्न नात्यातील मुलासोबत लावण्यात आले. हे सर्व फिल्मी नसून खरंच घडले आहे.
 
नेमकं काय घडलं?
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका मुलीचा विवाह मुंबईतील मुलासोबत बुधवारी आयोजित केलं गेलं होतं. गांधेली येथे सोहळा पार पडणार होता कारण मुलीचे मामा आणि बहीण येथे राहतात. लग्नासाठी मुंबईहून वरात आली. लग्न लागण्याआधीच वऱ्हाडीतील अनेक जण दारू प्यायले होते. दुपारी साडेबारा वाजताचा मुर्हूत असूनही 3 वाजेपर्यंत लग्न लागले नव्हते कारण वरातीमध्ये वऱ्हाडी नाचत असल्याने लग्नाला उशीर होत होता.
 
विनवण्या केल्यानंतर लग्न लागले मात्र वऱ्हाडींनी जेवणावरून गोंधळ घालायला सुरुवात केली. ठरल्यानुसार पुरोहिताचे अर्धे पैसे देण्याची मागणी केल्यावर नवरदेवाच्या नातेवाइकांनी नवरीच्या मेहुण्याला मारहाण केली. यावरून वाद विकोपाला गेला.
 
नंतर मारहाणीत वधू पक्षाकडील दोन महिलाही जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाद मिटल्याचे वाटत असल्यानंतर वऱ्हाड निघण्याच्या वेळेस नवरदेवाने मुलगी पसंत नाही म्हणून सोबत नेणार नाही असे सांगितले. यामुळे नवरीच्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडींना बेदम मारहाण केली, गाड्या फोडल्या. दबाव घालूनही जेव्हा नवरा नवरीला घेऊन गेला नाही तेव्हा अशा नवऱ्यासोबत नांदण्यास वधूने विरोध केला. नंतर मुंबईच्या वऱ्हाडींना परत पाठवून लगेच दुसरा मुलगा शोधून मुलीचं रात्री साडेनऊ वाजता दुसरा विवाह लावून दिला गेला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

इंद्रायणी नदीचे सुरू असलेले काम एका दिवसात करणे अवघड, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेकडे मागितली वेळ

काँग्रेसचे मित्रपक्ष का करत आहेत फडणवीसांचे कौतुक? त्याचा राजकीय अर्थ जाणून घ्या

LIVE: गरीब कामगारांना घरे देण्याच्या योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाकडून नवी मागणी

पुढील लेख
Show comments