Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित राज ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश,महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खास एंट्री

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (17:52 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होणार असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. मुंबईत सोमवारी  मनसेची कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील सर्व विधानसभा जागेचे सर्वेक्षण मनसेकडून केले जात आहे. आता पर्यंत 88 जागांचे सर्वेक्षण केल्याचे अहवालात आले आहे. या 88 जागांसाठी संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येत आहे. 

यंदा निवडणूक एकट्याने लढवायची की महायुतीसोबत युती करायची हा मुद्दा देखील चर्चेला आहे. पुढच्या महिन्यापासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यांच्या मुलगा अमित ठाकरे देखील आता राजकारणात प्रवेश करणार असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खास एंट्री करणार आहे. निवडणुकीच्या पक्षाच्या प्रचारात अमित ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

पक्षाच्या कोअरग्रुपच्या बैठकीबाबत मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, आज आमच्या पक्षाची बैठक होती. या बैठकीत निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत प्रत्येकाला अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे.त्यावर चर्चा पुढे केली जाईल. 

सध्या ओबीसी आणि मराठा समाजात ज्या प्रकारे द्वेष वाढत आहे. त्यासाठी सर्व समाजाला सोबत घेणे गरजेचे आहे. जातीयवादामुळे मतांचे विभाजन होते. मी पाहिले आहे की आता राज्यातील शाळकरी मुलेही जातीबद्दल बोलू लागली आहेत.
 
राज्यात जाती-धर्माच्या नावाखाली विष पसरवले जात आहे. याचा फायदा त्यांना होतो, त्यामुळे ते विष पसरवत आहेत. इतर राज्यासारख्या घटना आपल्या राज्यात ही घडू लागतील असे ते म्हणाले. 

Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात ट्रेन रुळावरून उतरवण्याचा कट,चाकात लोखंडी गेट अडकले

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक,आतापर्यंत 24 आरोपींना अटक

उदय सामंत पुन्हा रत्नागिरीतून विजयी होणार की उद्धव सेना जाणून घ्या समीकरण

LIVE: धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

भाजपने जतमधून गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवले

पुढील लेख
Show comments