Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावती-अकोला 75 किलोमीटरचा रस्ता 4 दिवसांत पूर्ण, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये नोंद

Webdunia
बुधवार, 8 जून 2022 (17:47 IST)
अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील 75 किलोमीटर रास्ता इतका खराब झाला होता या मार्गावरून जाण्यावरून प्रवाशी कंटाळवाणी होत होते. पण आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ते रस्ता निर्मितीचा ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे. हा रास्ता 75 किलोमीटरचा असून या रस्त्याचे निर्मितीचे काम अवघ्या पाच दिवसात पूर्ण झाले आहे. काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड रस्त्याच्या निर्मितीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली आहे. 

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे विक्रमी बांधकाम राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कडून करण्यात आले आहे. महामार्गावरील लोणी ते बोरगाव मंजू या 75 किमी रस्त्याचे बांधकामबिटूमिनस काँक्रीट पद्धतीने करण्यात आले. या अमरावती- अकोला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे विक्रमी बांधकाम 3 जून पासून सुरु झाले असून 7 जून रोजी रस्ताचे बांधकाम 728 मनुष्यबळ लावून पूर्ण झाले. 
 
अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अमरावतीच्या लोणी ते अकोल्याच्या मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम, 3 ते 7 जून दरम्यान करण्याचे नियोजन कंपनीने केले. राष्ट्रीय महामार्गावरील, अमरावती ते अकोला जिल्ह्यातील, चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने 3 जूनला सकाळी 6 वाजेपासून ते 7 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम पूर्ण झाले. यासाठी 728 मनुष्यबळ लागले.
 
या रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे. काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. यावेळी गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

<

Proud Moment For The Entire Nation!

Feel very happy to congratulate our exceptional Team @NHAI_Official, Consultants & Concessionaire, Rajpath Infracon Pvt Ltd & Jagdish Kadam, on achieving the Guinness World Record (@GWR) of laying 75 Km continuous Bituminous Concrete Road... pic.twitter.com/hP9SsgrQ57

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 8, 2022 >केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मला या टीमचं अभिनंदन करताना खूप आनंद होत आहे. राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि जगदीश कदम यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन. 75 किमी अखंड बिटुमिनस काँक्रीट रस्ता टाकण्याचे काम तुम्ही पूर्ण केलं. तुमच्या चिकाटी आणि कामाच्या बळावर नवे व्हिजन तयार होत आहे. सर्व इंजिनिअर आणि कामगारांचे आभार. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दात गडकरींनी कौतुक केलं आहे. 
 

संबंधित माहिती

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

पुढील लेख
Show comments