Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आणि सुप्रिया सुळे धावतच विधानभवनाबाहेर

Webdunia
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule walk outs) या अचानक विधानभवनातून धावत गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule walk outs) सकाळपासून विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचं स्वागत करत होत्या. आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची गळाभेट घेऊन, अजित पवारांच्या पाया पडून, आमदारांना हस्तांदोलन करुन सुप्रियांनी सर्वांचं स्वागत केलं. मात्र त्यांना अचानक फोन आला आणि त्या धावत विधानभवनातून निघून गेल्या.
 
सुप्रिया सुळे यांना नेमका कोणाचा फोन आला, फोनवरुन त्यांना काय माहिती मिळाली याबाबत अद्याप काहीच माहिती उपलब्ध नाही. फोन आल्यानंतर सुप्रिया सुळे तातडीने धावत विधानभवनातून निघाल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. नेमकं काय घडलंय याचा अंदाज कोणालाही बांधता आला नाही.
 
सर्वपक्षीय आमदारांचं स्वागत
 
सर्वपक्षीय नवर्निवाचित आमदारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः विधीमंडळाच्या गेटवर उभ्या होत्या. विधीमंडळात पाऊल ठेवणारे आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळेंनी स्वागत केलं, तर मोठे बंधू अजित पवार यांना मिठी मारत त्या पाया पडल्या होत्या.
 
गेला महिनाभर आमदारांच्या मनात धाकधूक आणि ताण होता. तो घालवण्यासाठी आपण स्वतः विधीमंडळात आल्याचं सुप्रिया सुळेंनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.
 
अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे गेले काही दिवस पवार कुटुंबात तणाव होता. मात्र अजित पवार यांनी राजीनामा देत घरवापसी केली. अजित पवार काल शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकमध्ये गेले होते.
 
अजित पवारांच्या पुनरागमनासोबतच पवार कुटुंबातील ताणही विरल्याचं चित्र आहे. ‘दादाचंच घर आहे, त्याला वेलकम करण्याचा प्रश्नच येत नाही’ अशी प्रतिक्रियाही सुळेंनी दिली होती. सुप्रिया सुळे यांनीही दादाला परत येण्यासाठी भावनिक साद घातली होती. व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यासोबतचा एक फोटोही त्यांनी शेअर (Supriya Sule Greets Ajit Pawar) केला होता.
 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज (बुधवार 27 नोव्हेंबर) बोलावण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेले ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित सदस्यांना शपथ (Maharashtra MLA Oath Ceremony) देत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून शपथविधी सुरु झाला.

संबंधित माहिती

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पुढील लेख
Show comments