Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'स्मार्ट कार्ड' योजनेला मुदतवाढ, अनिल परब यांची माहिती

Webdunia
गुरूवार, 17 मार्च 2022 (21:43 IST)
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच सध्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आगार तसेच विभागीय कार्यालयात स्मार्टकार्ड (ST smart card) नोंदणीकरण आणि वितरण प्रक्रिया होऊ शकलेली नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला 31 मे, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. 
 
राज्य परिवहन सेवेतील प्रवासासाठी 1 जून, 2022 पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याने या मुतदवाढीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री परब यांनी केले आहे.  महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देत आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली  'स्मार्ट कार्ड' काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे.
 
एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्डासाठी नोंदणी करणे किंवा स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख