Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती

Webdunia
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (08:14 IST)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षपदी मा. चित्रा वाघ यांची नियुक्ती केली.भाजपा प्रदेश कार्यालयात मा. प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व मावळत्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. उमा खापरे उपस्थित होते.
 
मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी चित्रा वाघ यांना नव्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मा. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपाशी जोडल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
 
 मा. चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते राज्यातील महिलापर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर आपण भर देऊ.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

सर्व पहा

नवीन

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर पुण्यातील बार आणि हॉटेल्सवर मोठी कारवाई

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments