Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या’ प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी कोरोनाबाधित खबरदारी म्हणून ‘काही दिवस’ शाळा बंद

Webdunia
शनिवार, 18 डिसेंबर 2021 (15:41 IST)
या तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर शाळेतील पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनामुळे जवळपास मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. मात्र आता लसीकरनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.मात्र तरी देखील पाथर्डी तालुक्यात पाच विध्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.या तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर शाळेतील पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
त्यानंतर शिक्षण विभागाने खबरदारी म्हणून दि.२३ डिसेंबर पर्यंत ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे.
त्यानंतर शाळा कॉलेज त्यासह प्राथमिक शाळा सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले. त्यानुसार प्राथमिक शाळा हळूहळू सुरू होत असतानाच पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील इतर शिक्षक व विद्यार्थ्यांची देखील तपासणी केली.
यावेळी एकूण २० जणांची तपासनी करण्यात आली. यात १५ विद्यार्थ्यांचे रिपोर्ट निगेटिव आले तर पाच विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
त्यामुळे ग्रामस्थांनी व शिक्षण विभाग यांनी खबरदारी म्हणून दि.२३ डिसेंबर पर्यंत येथील जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रत्येक नागरिकाने शालेय विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments