Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी १ ची भर..! -चित्रा वाघ

Webdunia
शनिवार, 7 जानेवारी 2023 (07:38 IST)
उर्फी जावेद हिच्यावर भाजपाच्या चित्रा वाघ यांनी तुफान टीका केली. तिच्या कपड्यांची स्टाईल यावरून त्यांनी टीका केली आहे. तशातच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन, चित्रा वाघ यांनाच नोटीस पाठवल्याची माहिती दिली. चित्रा वाघ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केला, ज्यातून आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार ही नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा, असेही चाकणकर म्हणाल्या. यावर आता चित्रा वाघ यांनीही उत्तर दिले आहे.
 
"स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी १ ची भर..!" अशी निर्भिड प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. "जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली. असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार..!! जय हिंद …जय महाराष्ट्र …!!" असे चित्रा वाघ यांनी ट्विट केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट प्रकरणात मृतांची संख्या नऊ वर

धारावीची जमीन महाराष्ट्र सरकारच्या खात्यांना हस्तांतरित होणार,अदानी समूह फक्त पुनर्विकास करणार

इलॉन मस्कनंतर राहुल गांधींनीही EVM वर वक्तव्य केलं, म्हणाले-

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यात घरातून 17.2 लाख रुपयांचे चरस जप्त, एकाला अटक

क्रिकेट सट्टेबाजीचे कर्ज फेडण्यासाठी महिलेची हत्या, आरोपीला अटक

रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला, गुन्हा दाखल

रात्री झोपेत छताचे प्लास्टर अंगावर पडून तिघे जखमी

पाटण्यात बोटीचा अपघात, 17 बुडाले, कुटुंबातील चार जण बेपत्ता

TDP ला लोकसभा अध्यक्षपद मिळाले नाही तर भारत आघाडी त्यांना पाठिंबा देईल, संजय राऊतांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments