Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये भाजप नेत्याच्या घरावर चाकू, सुरे- पिस्तूल घेऊन चढवला हल्ला

Vikram Nagre
Webdunia
शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (06:31 IST)
नाशिक : शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहे. भरवस्तीत हत्या, प्राणघातक हल्ले, चोरी, लूटमारी, दरोडे, छेडछाड अशा एक ना अनेक गुन्हेगारी घटना समोर येत असताना आता भाजप नेत्याच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे (Vikram Nagre, State Secretary of BJP Workers Aghadi) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. हातात चाकू, सुरे आणि पिस्तूल घेऊन त्यांच्या घरावर हल्ला चढवण्यात आला. विक्रम नागरे हे यावेळी घरात उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या मातोश्रींना धमकावल्यानंतर सदर गुंड निघून गेले, अशी माहिती समोर आली आहे.
 
सात ते आठ जणांच्या टोळक्याने सातपूर परिसरातील नागरिक यांच्या घरावर दगडफेक करत घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढेच नाही तर घराबाहेर लावलेले बॅनर देखील या गुंडांनी फाडले. परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवली. अशात वरदळीच्या ठिकाणी थेट घरावरच हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
 
वर्दळीच्या ठिकाणी अशाप्रकारे हल्ला झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान विक्रम नागरे हे यावेळी घराबाहेर असल्याने ते बचावले असल्याचं देखील म्हंटलं जात आहे. याप्रकरणी ७ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना घडल्याने नाशिक शहरात पोलिस आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकार प्रशासकीय सुधारणा, महिला आणि बालविकास विभागात प्रथम क्रमांकावर

LIVE: इगतपुरीमध्ये पाणीटंचाईविरोधात महिलांनी काढला मोर्चा

कल्याण : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना अटक

आयटीआय विद्यार्थिनीची तिच्या प्रियकरानेच केली निर्घृण हत्या

पंकजा मुंडे यांनी जातीय जनगणनेबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments