Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भीमा कोरेगाव प्रकरण : पोलिसांनी १२ जणांना घेतले ताब्यात

bhima koregaon
Webdunia
मंगळवार, 9 जानेवारी 2018 (17:31 IST)
भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांनी कारवेस सुरुवात केली आहे. यामध्ये तब्बल आठवडाभरानं पोलिसांनी पहिली कारवाई केली आहे. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात करण्यात असी असून 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन जण अल्पवयीन आहेत. यामधील सर्व संशयित आरोपी हे भीमा कोरेगाव, सणसवाडी आणि कोंढापुरी या तीन गावांमधील रहिवासी आहेत. यात जे पकडले गेले आहेत त्यामध्ये दोन्ही गटातील व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अतिशय संवेदनशील प्रकरण असल्यानं बाराही आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत करणार नाहीत. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची सध्या पोलीस कसून चौकशी करत असून. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आला, किंवा यामागे नेमकं कोण होतं? या सर्व गोष्टींची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. आठवड्याभरानंतर 12 जणांना अटक करण्यात आलेली असली तरीही पोलिसांचा याप्रकरणी अजूनही पुढील तपास सुरु राहणार आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम करत असून जे दोषी आढळतील त्यांना अटक करण्यात येणार आहे. हे प्रकरण राज्य सरकारने योग्य रीत्या हाताळले नाही असा आरोप विरोधकांनी केला होता. तर अनेक सामाजिक संस्था आणि विचारवंतानी या घटनेचा निषेद केला असून भिडे गुरुजी यांवर सुद्धा अनेकानी आरोप केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

या शाओमी स्मार्टफोनवर मिळत आहेत प्रचंड सवलती आणि बँक ऑफर्स

चालत्या ट्रेनमध्ये हा मालक त्याच्या कुत्र्यासोबत काय करत होता आणि मग हे घडले?

श्रीमंत होण्यासाठी मुलींच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करून तंत्र मंत्र करणाऱ्याला अटक

14 एप्रिल रोजी या सहा महिला इतिहास रचतील, पहिले महिला क्रू मिशन अंतराळात रवाना होणार

भाजप पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवू इच्छितात नितेश राणे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments