Dharma Sangrah

भुशी धरण काठोकाठ भरले

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2019 (16:20 IST)
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याचा भुशी धरण काठोकाठ भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील पर्यटकांना इथे येण्याचे वेध लागतात. पावसासोबतच या ठिकाणी धुक्याचे प्रमाण देखील बरेच असल्याने मुंबईकर आणि पुणेकरांची या ठिकाणी दरवर्षी गर्दी पहायला मिळते.
 
पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात. शुक्रवारपासून मुंबई आणि पुणे परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भुशी धरण परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरण ओसंडून वाहू लागले आहे. जोरदार पावसाचा फटका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूकीला बसला असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. मात्र त्याचवेळी भुशी धरण भरल्याने पर्यटक पावसाचा आनंद लुटण्याबरोबर धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणासाठ्यात वाढ झाली. सोमवारी सकाळपासून धरण काठोकाठ भरुन वाहू लागले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

वृद्ध पालकांची काळजी घेतली नाही तर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या १० टक्के रक्कम कापली जाऊ शकते; तेलंगणाच्या काँग्रेस सरकारचा निर्णय

दिल्ली विमानतळ सहा दिवसांसाठी बंद राहणार; विमान आणि प्रवाशांवर होणार परिणाम?

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांशी असलेल्या संबंधांबाबत अजित पवार यांचे विधान आले समोर

LIVE: राज्यात चार दिवसांचा ड्राय डे जाहीर

राज्यात महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांचा ड्राय डे जाहीर

पुढील लेख
Show comments