Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बियाणी हत्याकांडातील शूटर दीपक रांगा ताब्यात

murder
Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (07:46 IST)
नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख शूटर दीपक रांगा याला नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला आज न्यायालयात हजर केले असता २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस  कोठडी सुनावली. ५ एप्रिल २०२२ रोजी संजय बियाणी यांच्या शारदानगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ््या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती. संजय बियाणी यांनी खंडणी न दिल्याने कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते.
 
एसआयटीने या प्रकरणात नांदेडमधून एकूण १७ जणांना अटक केली. गोळ््या झाडणारे दोघे फरार होते. त्यापैकी दीपक रांगा याला गेल्या जानेवारी महिन्यात एनआयएने नेपाळ बॉर्डरवर अटक केली होती. त्याच्यावर पंजाब येथील मोहाली पोलिस मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला केल्याचा आरोप होता. शिवाय अनेक प्रकरणात तो पंजाब, हरियाणा, नांदेड पोलिसांना हवा होता. सध्या दीपक रांगा चंदीगड कारागृहात बंद होता. संजय बियाणी हत्याकांडाच्या तपासासाठी नांदेड पोलिसानी दीपक रांगा याला ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

मोदींचा मास्टर प्लान: पाकिस्तानचा 'Endgame' तयार, शेजारी देशाचे तुकडे तुकडे होतील का?

संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल, पहलगाम हल्ला लपवण्यासाठी सरकारची नवीन रणनीती, म्हणाले- हे राहुल गांधींचे श्रेय

LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

Mumbai Weather Today १ मे रोजी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे; कधी ढगाळ राहील जाणून घ्या

"मराठी भाषा" वर घोषवाक्य

पुढील लेख
Show comments