Dharma Sangrah

भाजपला मोठा झटका, तब्बल 5 हजार कार्यकर्ते सेनेच्या वाटेवर

Webdunia
शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (12:13 IST)
औरंगाबाद-नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने सोयगाव नगरपंचायतीवर सत्ता मिळवत भाजपला धक्का दिला. आता भाजपला दुसरा धक्का बसणार आहे याचे संकेत राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
 
शिवसेनेच्या शिवतेज अभियाना अंतर्गत आयोजित कार्यकर्मात अब्दुल सत्तार म्हणाले की नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसलं आता मतदारसंघातून भाजपचा लवकरच सुपडासाफ होईल. त्यांनी भाजपचे पाच हजार पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावाही केला आहे.
 
भाजपचे अनेक पदाधिकारी आपल्या संपर्कात असून सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील 5 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
 
इकडे सोयगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला होता. पण, आज पुन्हा एकदा सत्तार यांनी दानवेंना आणखी एक तडाखा दिला आहे. सत्तार यांनी भाजपचे 4 नवनिर्वाचित सदस्य सेनेत सामील झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

राजस्थान उच्च न्यायालयात बॉम्बची धमकी, शोध मोहीम सुरू

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी जाहीर

माझ्या मुलीला सॅनिटरी पॅड हवा आहे, ब्लड येत आहे... इंडिगो वादाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेला वडिलांचा व्हिडिओ!

चंद्रपूरमध्ये वन्य प्राण्यांना ट्रेनची धडक, अपघातात सांबर, चितळ आणि साळूचा मृत्यू

पुढील लेख
Show comments