Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:21 IST)
त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावती , नांदेड मलेगावसह ग्रामीण भागात उमटले आहेत. या ठिकाणी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षडयंत्र आहे, असा थेट आरोप नाना पटोले  यांनी केला आहे.  अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा नाना पटोले  यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
 
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना  यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून  सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले. यामध्ये महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन देशभर भाजपच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. या प्रमुख मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपचे हे षडयंत्र केले जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
 
तसेच हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी. समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राकारण करणे हा भाजपचा इतिहास  राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्रोशाला त्यांना तोंड देता येत नसल्याचे पटोले म्हणाले.
 
जनतेमध्ये भाजप आणि मोदी सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे.या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये यासाठी दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे.राज्यातील जनतेने भाजपचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडू नये,
राज्यात अशांतता राखावी, असे आवाहन पटोले यांनी केले.

संबंधित माहिती

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

पुढील लेख
Show comments