Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुद्धांच्या आचारविचारांचे विविध देशांमधील प्रतिबिंब अजिंठा-वेरुळ लेण्यांच्या परिसरात बघता येणार

Webdunia
बुधवार, 3 मे 2023 (08:09 IST)
ANI
भगवान गौतम बुद्धांच्या आचारविचारांचे विविध देशांमधील प्रतिबिंब अजिंठा-वेरुळ लेण्यांच्या परिसरात बघता येणार आहे. १० बाैद्ध देशांना त्यासाठी येथे प्रत्येकी पाच एकर जागा राज्य सरकार नाममात्र दराने देणार आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी पत्रकारांशी अनाैपचारिक चर्चा करताना ही माहिती येथे दिली.
 
बोधगया येथे विविध देशांनी स्तूप आणि गौतम बुद्ध यांच्या अप्रतिम मूर्ती साकारल्या आहेत. त्याच धर्तीवर अजिंठा-वेरुळमध्ये जगभरातील बौद्ध संस्कृतीचे दर्शन बुद्ध थीम पार्कमध्ये  घडू शकेल. येत्या सहा महिन्यांत या प्रकल्पाची उभारणी सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असे लोढा यांनी सांगितले.
 
कार्लाजवळ चाणक्य संग्रहालय
लोणावळाजवळ असलेल्या कार्ला लेणी परिसरात एमटीडीसीच्या जागेवर चाणक्य थीम पार्क उभारले जाईल. आर्य चाणक्यांच्या पाच सिद्धांतांवर आधारित हा पार्क असेल.
राज्यात ५०० ठिकाणी उद्योजकता प्रशिक्षण केंद्रांची उभारणी केली जाईल. शिवराज्याभिषेक दिनी ६ जूनला एकाचवेळी या केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न असेल.
 
मुंबई महोत्सव नोव्हेंबरमध्ये
मुंबईच्या विविध संस्कृतींचे दर्शन घडविणाऱ्या मुंबई महोत्सवाचे आयोजन नोव्हेंबरमध्ये पर्यटन विभाग करणार आहे. जून-जुलैमध्ये कोकणात कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबई : रॅगिंग करणारे दोन एमबीबीएस विद्यार्थी निलंबित

आरएसएसच्या कार्यक्रमावर चाकू आणि काठ्यांनी हल्ला, 7-8 जण जखमी

भाजप आज जाहीर करणार 50 उमेदवारांची पहिली यादी ! MVA मध्ये 80 जागा अडकल्या !

टोमॅटोने भरलेला ट्रक उलटल्याने लुटण्यासाठी आला जमाव, रात्रभर पोलिसांनी दिला पहारा

महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का, आचारसंहिता भंग प्रकरणी महायुतीच्या शिंदे सरकारवर कारवाई

पुढील लेख
Show comments