Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूरच्या मुरुडमध्ये बस अपघात; ४० जण जखमी, १४ गंभीर

Webdunia
मंगळवार, 17 जानेवारी 2023 (15:28 IST)
लातूरच्या मुरुडमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातात ४० जण जखमी झाले असून त्यापैकी १४ गंभीर आहेत. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

निलंगावरून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसचा मुरूड जवळ स्टेरिंग रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली कोसळली. यामध्ये पन्नास पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. ही घटना आज  घडली. जखमींवर मुरूड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
निलंगा आगाराची बस (MH20 BL 2372) निलंग्याहून पुण्याकडे जात होती. सकाळी आठच्या सुमारास बोरगाव काळे ते मुरुड दरम्यान बसचा स्टेरिंग रॉड तुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व बस पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. घटनेनंतर बोरगाव काळे शिवारातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवाशांना बस बाहेर काढले. याबाबत मुरुड पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments