Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा पाऊस, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारा पडण्याची शक्यता

Webdunia
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (10:31 IST)
हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारा पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 16 फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. 17 फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तीनही विभागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 
 
18 फेब्रुवारीलाही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल. कोकण विभागात 17 आणि 18 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. पावसाच्या कालावधीत रात्रीच्या किमान तापमानात आणखी वाढीची शक्यता आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानंतर शेतकऱ्यांच्या चिंता आणखी वाढणार आहेत. पाऊस पडल्यास यामुळे पीकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments