Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर-मनमाड वाहतूक मार्गात बदल; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

Webdunia
मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (08:10 IST)
अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
 
अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन आहे. अहमदनगर/पुणे-सोलापूरकडून मनमाड कडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट – दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापूर- वैजापूर- येवला मार्ग वळविण्यात येणार आहे. शनि शिंगणापुर /सोनई रोडवरुन वरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणाऱ्या अवजड वाहतूकदारांनी राहुरीकडे न येता अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावरुन इच्छित स्थळी जावे.
 
मनमाड – येवला – शिर्डी कडून अहमदनगर मार्गे पुणे / मुंबई कल्याण कडे जाणारी अवजड वाहतूक पुणतांबा फाटा येथून चंदे कासार – संगमनेर आळेफाटा मार्ग वळविण्यात येणार आहे. मनमाड- येवला कडून अहमदनगर / सोलापूर / बीड कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुक पुणतांबा फाटा येथून वैजापूर- गंगापुर मार्ग कायगाव- प्रवरासंगम -शेंडी बायपास -विळद घाट – केडगाव बायपास मार्ग वळविण्यात येणार आहे. तसेच लोणी / बाभळेश्वर / श्रीरामपूर कडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाभळेश्वर- -श्रीरामपूर -टाकळीमान नेवासा मार्गे अहमदनगरकडे वळविण्यात येणार आहे.
 
अत्यावश्यक मालाची वाहतूक करणारी वाहने, रस्ता दुरुस्तीकरीता आवश्यक वाहने व स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना या वाहतूक मार्गाच्या वापरापासून सूट देण्यात आली आहे. या पर्यायी वाहतूक मार्गासाठी नागरिकांच्या काही हरकती असल्यास शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अहमदनगर येथे समक्ष येवून किंवा pi.tfccity.anr@mahapolice.gov.in ई-मेलवर १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहनही श्री. मनोज पाटील यांनी केले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

LIVE: संतप्त छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

संतप्त छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, राजकीय खळबळ वाढली

PV Sindhu : भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने व्यंकट दत्ता साईसोबत लग्नगाठ बांधली

पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर मायावतींचा हल्लाबोल

पुढील लेख
Show comments