Festival Posters

चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (08:30 IST)
राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण  यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत आता प्रवीण चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया आलीय. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल, असं सांगत चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावलेत.
 
फडणवीसांच्या आरोपांबाबत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना माध्यमांनी विचारलं असता माझा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल. मी अजून व्हिडीओ पाहिला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलीस नाही तर फॉरेन्सिक विभागत तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही तर सरकार ठरवतं, अशी प्रतिक्रिया प्रवीण चव्हाण यांनी दिलीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू असलेल्या राजकारणावर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे संतापले; म्हणाले- "हे खूप दुर्दैवी आहे..."

बारामतीमधील 'विद्या प्रतिष्ठान' म्हणजे काय?, जिथे अजित पवारांना अंतिम निरोप दिला जाईल

कोलंबियामध्ये विमान कोसळले, संसद सदस्यासह १५ जणांचा मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यावर आज बारामती येथे अंत्यसंस्कार होणार; पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील

पुढील लेख
Show comments