Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छगन भुजबळ यांची सुटका होणार ?

Webdunia
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लाँड्रिंग कायद्यातलं कलम ४५ सुप्रीम कोर्टानं घटनाबाह्य ठरवलंय. त्यामुळं या आरोपांखाली तुरूंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. 
 
याप्रकरणात कलम ४५ मधल्या तरतुदींनुसार ज्या आरोपींना जामीन नाकारण्यात आला होता ते आदेशही सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेत. त्यामुळं अशा आरोपींना जामीन मिळण्याची चिन्ह आहेत. पीएमएलए कायद्यातील  कलम ४५ हे  काळ्या पैशाला चाप लावण्यात महत्त्वाचे अस्त्र असल्याचे केंद्र सरकारला वाटत होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने हे कलमच घटनाबाह्य ठरवल्यानं सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.  याच आधारे छगन भुजबळ आणि रमेश कदम हे युक्तीवाद करणार असल्याचं सुत्रांनी सांगितलंय. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments