Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छिंदमला केले पोलिसांनी तडीपार, शिवरायांचा अपमान केला होता

Webdunia
गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (16:27 IST)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वाईट शिव्या देत अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला अहमदनगरमधून तडीपार केले आहे. पोलिसांनी  अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. छिंदम हा या निवडणुकीत प्रभाग क्र – ९ मधून निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा असून, शिवाजी महाराजांबद्दल घृणास्पद वक्तव्य करत वाद ओढवून घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाने छिंदमच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. कोर्टाने त्यावर सुनावणी केली आणि त्यांनतर छिंदमला तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत.अहमदनगर महानगरपालिकेत छिंदम हा भाजप पक्षाकडून उपमहापौर या पदावर होता. एका कंत्राटदाराशी फोनवर संभाषण करत असताना त्याने शिवाजी महाराजांबद्दल अश्लिल आणि घृणास्पद शब्द वापरले. त्यामुळे संबंध महाराष्ट्रात छिंदम विरोधात संताप व्यक्त केला होता.  भाजपच्या विरोधातही लोकांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे भाजपने छिंदमला उपमहापौर पदावरून दूर केला होता. त्यानंतर आता तो पुन्हा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments