Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना पत्र, अमित शाह यांना थेट उत्तर

Webdunia
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (21:47 IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्गमध्ये येऊन शिवसेनेला संपवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं आहे. हे उत्तर त्यांनी शिवसैनिकांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून दिलं. ते पूर्ण पत्र इथं देत आहोत. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण पत्र
“जे शिवसैनिक आहेत त्यांना माझ एक सांगणे आहे की आताची लढाई ही रस्त्यावरची राहिलेली नाही, आता तुमचा सर्व विषयांचा अभ्यास दांडगा पाहिजे, तरच तुम्ही राजकारणात पुढच्या माणसाला गप्प करू शकता.
 
जय महाराष्ट्र!!!!!!!!!
बाळासाहेबांचा एक शिवसैनिक…
 
देशाचे गृहमंत्री असणारे श्री. अमित शाह यांनी शिवसेना संपविण्याचे,हे जे वाक्य आहे ते त्यांनी नारायण राणे यांच्या कार्यक्रमात उच्चरले त्या वेळेस नारायण राणे यांना सुद्धा हसू आवरले नसेल.कारण राणे त्यांनी मागील पंधरा वर्ष शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता. पण त्यांना काही जमलं नाही. म्हणून त्यांनी अमित शहा यांना आपल्या गावात बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली.आणि म्हणून अमित शहा असे बोलले असतील, असं मला वाटले.
 
एक गुजराती माणूस महाराष्ट्रात येऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो, आणि नारायण राणे सकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठी जण या वाक्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल.
 
आता शिवसेनेचे सर्वच विषय काही मराठी माणसाला भले पटत नसतील, पण 19जून 1966 साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा विशेष करून मुंबई आणि लगतच्या ठाणे परिसरात मराठी माणसाची परिस्थिती खूप वाईट होती. भाषांवार प्रांतरचने मुळे मुंबई मराठी माणसाला मिळावी, त्या साठी 105 मराठी माणसे हुतात्मे झाले.पण मुंबईची आर्थिक नाडी त्या वेळेस परप्रांतीयांच्या हातात होती. मराठी माणसा कडे तेव्हा कोणतेच उद्योग नव्हते,चांगले शिक्षण नव्हते त्यामुळे सरकारी नोकरीत मराठी माणूस खालच्या पदावर काम करत होताआणि ही सर्व परिथिती बघून वंदनीय बाळासाहेब अस्वस्थ व्हायचे आणि त्यातून जी क्रांती झाली,त्याच नाव शिवसेना
 
तो शिवसेनेचा सर्व इतिहास आपणा सर्वाना माहीतच आहे.
 
आणि तेव्हा शिवसेना आणि फक्त शिवसेनाच मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर होती, म्हणून आज मराठी माणूस मुंबई शहरात ताठ मानेने उभा आहे, हे कोणीही नाकारू शेकत नाही. आता पिढी बदलत आहे, पण इतिहास मात्र बदलत नसतो.
जय महाराष्ट्र!!”
 

संबंधित माहिती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

पुढील लेख
Show comments